हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २ जुलै, २०२०

ACTOR














      ACTOR




Hey Stella!! 
अशी अवकाशाची पोकळी व्यापून टाकणारी हाक कानावर पडते,
Marlon Brando ची

खाडकन उठतो मी बेडमधून 
मिळेल ते पुस्त्तक वाचायला लागतो अधाश्यासारखं
माझ्या mobile मध्ये असेल ती movie बघतो बरकाव्यांसहीत
पुन्हा पुन्हा Brando च्या मनातले भाव समजून घ्यायचा प्रयत्न करतो

तो बाहेर तसाच उभा असतो, 
माझी वाट बघत
आता त्या Stella ऐवजी माझंच नाव ऐकू यायला लागतं मला, Vitthala
बाहेर कोणाशी तरी बोलतो तो माझ्याबद्दल
‘‘I will make him an offer he can’t refuse’’

मग धाडकन माझ्या रूम मध्ये येतो
माझे खांदे पकडून मला हलवून जागा करतो
माझ्या डोळ्यांमध्ये नजर रोखून म्हणतो
“Be like a man!” 
Character चा सामना कर
त्याच्या पासून पळू नको
“Character can’t move without you... He is waiting for you... Make him free to fly”
मग जरा शांत होत म्हणाला
बाळ, character ची माहिती फक्त गोळा करायची नसते
ती आत्मसात करून मांडायची असते
रिकाम्यावेळी ती आत्मसात कर
बाहेर पड, बरीच पात्रं वाट पाहत आहेत तुझी
रडू नको जवळ काही नाही म्हणून
लक्षात ठेव ज्यांच्या जवळ काही नसतं फक्त त्यांनाच संधी असते, 
बरंच काही मिळवण्याची

तो निघून जातो
मी पुन्हा पुन्हा Brando  च्या मनातले भाव समजून घ्यायचे प्रयत्न करतो
आणि Brando चा किमान शंभरावा तरी भाग व्हावं, 
असं वाटत राहतं

मग करतो त्या  Hey Stella!! ची rehearsal आरशा समोर, 
वेळेचं भान विसरून
तोच आरशात माझ्या पाठीमागे उभा असतो 
Robert De Niro ! 
गालातल्या गालात हसत
हळूच खांद्यावर हात ठेवून मला समोरून पाहायला सांगतो
मग आरसा आणि मी एकच होतो
“You talking to me? You talking to me?  I’m the only one here”
असंख्य पद्धतीने मला शिकवतो
पुढे फक्त त्याचे डोळे बोलतात 
“You talking to me ?”
आणि ढकलतो मला अभिनयाच्या समुद्रात
या समुद्रातील कोट्यावधी, अगणित, अनंत जीव म्हणजे पात्राच्या मनातील भाव भावना आहेत
एवढं सगळं असतं भरलेलं फक्त एका पात्रात ! 
‘ते’ दाखव तू
मुठभर भावभावना दाखवून दुकान मांडू नको acitng चं
असं म्हणून त्यानं जोरकस सूर मारला त्या समुद्राच्या खोल पोटात
तिकडे काहीतरी आहे म्हणाला

थकून मी किनाऱ्यावर आलो
वाळूवर शरीर टाकावं म्हणलं, 
तोच त्या काठीचा खटट् असा आवाज आला मागून, 
पाहतो, तर मागे 
Al Pacino  
हाताच्या अंतरावर
अंध Al Pacino
“I’m in the dark here. There was a time I could see”
असं म्हणून मला शोधायला हवेत हात फिरवला
क्षणार्धात मी त्याच्या हाताला लागलो 
किंचित चाचपडला, माझी ओळख पटली,
खांद्यावर हात टाकून निघाला मला घेऊन, 
अंधारातला प्रकाश शोधायला
लक्षात ठेव अंधाराचा सुद्धा त्याचा स्वतःचा एक उजेड असतो
चाचपडू नको, घाबरू तर नकोच नको
इतरांसारखा घाईघाईत अंधार मांडू नको
थोडा वेळ थांब, पेशन्स ठेव, मैत्री कर त्या अंधारा बरोबर
मग तुला तो त्याचा उजेड दाखवेल
डोळे दिपतील तुझे, घाबरू नको
तो उजेड तुझ्या डोळ्यांमध्ये भर
आणि हा प्रकाश दाखंव तू तुझ्या डोळ्यांमधून
लक्षात ठेव डोळे समोरच्याच्या हृदयाशी बोलतात
वाटेत त्याने हात सोडला,
एकटा चालायला शिक म्हणाला
त्याचा निरोप घेतला, 

रुममध्ये आलो मी माझ्या... अंधाऱ्या...
बेडवर पडलो
उशाशी हालचाल जाणवली
मी झट्कन मान वळवली
Morgan Freeman खुर्चीत बसलेला
हसला
खुर्ची सरकवून जवळ आला
माझ्या कपाळावर थोपटत थोपटत म्हणाला
संवेदना जाग्या ठेव
एका actor साठी फार गरजेचं असतं ते
रस्त्यावरचा असलास तरी 
बंगल्यातल्या पण संवेदना जाण
बारकाईने अनुभव, चौकस राहा
कोणाचा तिरस्कार करू नको
त्याचंही काहीतरी म्हणणं आहे
‘ते’ तू सांग
दुवा हो त्याच्यात आणि जगात
समोरच्याला बोलतं कर , 
तू मात्र शांत राहा

बऱ्याच जणांना आवाज नसतो
त्यांचा खणखणीत आवाज हो
धार आण तुझ्या विचारांना आणि अभिनयाला
दुबळं प्रतिनिधित्व करू नको त्यांचं
अन्याय आहे त्यांच्यावर हा

लक्षात ठेव, 
समोरच्याला ठेच लागली तर पाणी तुझ्या डोळ्यांत यायला हवंय
संवेदना जाग्या ठेव
उघड्या दरवाजातून Morgan Freeman नाहीसा झाला
दरवाजा बंद करायला उठलो 

तोच अंधारातून एक म्हातारा, 
धोतराचा सोगा हातात धरत, 
ताडताड चालत आला
निळूभाऊ फुले
मी काही बोलायच्या आत भाऊ ओरडले माझ्यावर
स्वप्नातून जागे व्हा, 
call time सांगायला आलोय सकाळचा
ST  ने जायचं आहे
लवकर या नाहीतर जागा मिळणार नाही बसायला
माझी प्रश्नार्थक नजर ओळखली
जवळ आले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला
पोरा स्वप्न बघ! बघ स्वप्न! पण स्वप्नातच रमू नको
वास्तवात ये, 
अमाप कष्ट कर त्यांच्यासारखं
प्रामाणिक राहा तुझ्या अभिनयाशी आणि स्वतःशी
लक्षात ठेव आपली कलाकृती ही आपलंच प्रतिबिंब असते
भाऊ निघून गेले

माझ्या नकळत मी झोपी गेलो
पण हे सगळेजण खांबांप्रमाणे
भक्कम उभे आहेत माझ्या मागे
दीपस्तंभ, समुद्री वादळातले
उद्या पुन्हा  Brando येईल मला उठवायला किंवा
Tom Hanks  किंवा Leonardo DiCaprio
किंवा सगळेच येतील मला तयार करायला
मग, एक दिवस मी पण होईल तयार
वाट बघतोय मी
त्या दिवसाची
अगदी मागे का असेना
पण त्यांच्यात उभं राहण्याची ...

  _Vitthal Nagnath Kale





२५ टिप्पण्या:

  1. तुझ्या कविता.. काळजाला हात घालतात.. जणू काही अस वाटत की तू ते जगत आहेस आणि सांगत आहेस...

    उत्तर द्याहटवा
  2. क्या बात है... ढकलून देतो अभिनयाच्या समुद्रात! मस्त... या उर्जाशक्तीचे असे दर्शन त्या प्रत्येक अभिनेत्याला, अभिनेत्रीला घडो जे सध्या सिलींगच्या पांख्याकडे अस्तित्व गमावल्याचा सद्म्यात प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत..

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान एका अभिनेत्याने मनापासून अनेक अभिनेत्या विषयी असे बोलणे आणि त्यांच्यातील चांगले गुण शोधून ते आत्मसात करणे.

    उत्तर द्याहटवा
  4. खुप मस्त,
    अतिशय बारकाईने लिहल आहे सरजी...👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. सर.. खुप छान वाटल वाचुन.खुप दिवसानी काही तरी मनाला स्पर्श करनार वाचयला भेटल.अप्रतीम👌🏻👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  6. शब्द मनावर खोलवर परिणाम करतात....हा दृष्टीकोण या क्षेत्रात उतरणाऱ्या प्रत्येक तरुणाचा हवा....खूप सुंदर👌😊

    उत्तर द्याहटवा
  7. हो खरं आहे समृद्धी.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. खुप छान लेख ✍ प्रत्येक अभिनेत्याला पात्राच्या अंतर्मनात झोकायला लावणारा लेख 🎭💯

    उत्तर द्याहटवा

Ranu Mondal (रानू मंडल)

आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो ज्यात रेल्वे स्टेशन वर  59 वर्षांची एक महिला गाणं गाते आहे "एक प्यार का नागम है मौजो की कहाणी है"....