सुरमा भोपली
सय्यद इश्तियाक अहमद जाफरी म्हणजेच जगदीप यांचं बुधवारी निधन झालं.
जगदीप यांना शोले चित्रपटातील सुरमा भोपाली या पात्राने खूप प्रसिद्धी मिळवून दिली. बरेच लोक त्यांना सुरमा भोपाली या नावानेच ओळखतात . (अर्थात हे त्यांचं अभिनयाचं कसब आहे. त्यांच्या इतरही भूमिका दर्जेदार आहेत.)
वास्तविक पाहता शोले या चित्रपटाने बऱ्याच कलाकारांना ओळख दिली. म्याक मोहन यांना सांभा , विजू खोटे यांना कालिया, अमजद खान यांना गब्बर अजून बरेच आहेत.
हे सगळं लिहिण्याचं कारण एवढंच आहे की, सय्यद इश्तियाक अहमद जाफरी म्हणजेच जगदीप हा अभिनेता किती कसलेला होता हे शोले चित्रपटातील त्यांच्या सिन वरून समजतं. (त्यांच्या बद्दल च्या प्रेमापोटी एकेरी उल्लेख केला आहे.)
वास्तविक पाहता शोले चित्रपटात जगदीप म्हणजेच सुरमा भोपाली याचा Scene असरानी म्हणनेच जेलर च्या Scene नंतर लगेच येतो.
"हम अंगरेज के जमाने के जेलर है ! हा हा ..." अस म्हणणारा असरानी त्याची चालण्याची लकब. धडपडणे, चिरक्या आवाजातील बोलणे, खरंतर ओरडणे हे अफलातून झालं आहे. असरानी ला बघितलं की आज ही आपल्याला तोच संवाद आठवतो.
"हम अंगरेज के जमाने के जेलर है! हा हा "
पण खरी गंमत ही आहे की अश्या प्रचंड विनोदी सिन नंतर लगेच जगदीप चा सुरमा भोपाली चा Scene येतो. या Scene मध्ये सुरमा भोपाली आपल्या लाकडाच्या वाखारीत, एका उंचवट्यावर बसून समोर बसलेल्या श्रोत्यांना, जय आणि विरुला त्याने एकट्याने कस पकडलं आणि एक एक मुस्कटात मारून कसं पोलिसांच्या ताब्यात दिलं, हे धडधडीत खोटं सांगतो आहे. आणि ते ही जय आणि विरु त्याच्या मागे उभे असताना (अर्थात हे त्याला सुरुवातीला माहित नसतं) हा Scene जेलर च्या scene नंतर लगेच आहे. प्रेक्षक जेलरच्या scene ला मनमुराद हसलेले असताना. पुढच्या नवीन पत्राच्या scene ला हसतील का ? हा प्रश्न येतो. पण या जगदीप नावाच्या बहाद्दराने चित्रपटातील हास्याचा आलेख खाली येऊ दिला नाही. उलट तो वर वर घेऊन गेला. त्याची अभिनयाची शैली, त्याचा तो गाडी अडकत अडकत चालावी असा विशिष्ट आवाज याच्या जोरावर त्याने तो छोटासा scene अफलातून केला आहे. तो जय विरुला पकडण्याची कथा सांगतो ती खोटी आहे हे समजतं आपल्याला पण तरीही आपण त्या कथेत गुंतत जातो, आणि प्रेक्षक म्हणून आनंदही घेतो. आपलं पितळ उघड पडल्यावर तो ज्या पद्धतीने त्याच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांवर ओरडतो ते बघण्या सारखं आहे. एखाद्या वाघा सारखा सुरमा भोपाली जय आणि विरु समोर आल्यावर सशासारखा अंग चोरून घेतो. त्याचं ते असं वागणं आपल्याला फार आनंद देऊन जातं. जेवढी भूमिका वाट्याला आली तेवढी चोख केली या जगदीप नावाच्या अभिनेत्याने.
आज हा जगदीप आपल्यात नसला तरी त्याचं ते मन प्रसन्न करणार काम नेहमी आपल्यात असेल. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
https://vnkale.blogspot.com/2020/07/blog-post.html
https://vnkale.blogspot.com/2020/07/actor.html
sunadar .. kup vichar purvak lihali ahe
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामस्तच की सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाMastach
उत्तर द्याहटवाThanks
हटवाImage came into Mind even though he no longer exists,with condolence.
उत्तर द्याहटवाYes. Thanks Punam
हटवा